ताज्या बातम्या

नागरिकांची सहनशक्ती जाड… आणि सत्ताधाऱ्यांचं कातडं अजून जाड!”“१५ वर्षे नगरसेवक खुर्चीत आणि जनता आजही चिखलात — विकास कुठे हरवला?”

“सत्ताधाऱ्यांची झोप अजून गाढ म्हणून मनसे पुन्हा झाली ‘अलार्म’!”


जळगाव | प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक १८/१९ मधील नितीन साहित्य नगर, अमित कॉलनी, कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी व औद्योगिक वसाहतीचा मोठा भाग अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे गंभीर वास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा समोर आणले आहे. पंधरा वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या प्रतिनिधींकडे या भागातील रस्ते, गटारी आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा मनसेने आज जाहीर आरोप केला आहे.महानगरपालिका निवडणुकीतील नवीन प्रभाग रचनेनुसार जुना प्रभाग क्रमांक १८ आता १९ झाला असला, तरी विकास मात्र केवळ कागदावरच दिसत असल्याची चीड नागरिकांमध्ये वाढत आहे.

उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि ललित शर्मा यांनी आज पुन्हा एकदा या भागाचा प्रत्यक्ष दौरा करत स्थितीची पाहणी केली. रस्ते अद्याप कच्चे, गटारी तुंबलेल्या, आणि अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे — अशा परिस्थितीत नागरिकांना रोजच्या जगण्याची झुंज द्यावी लागत असल्याचे समोर आले.

मनसेने सांगितले की—२०१७ पासून सागर अपार्टमेंट ते कृष्णानगर पाटीपर्यंत रस्त्याची खडीसुद्धा टाकण्यात आलेली नाही. सुप्रीम कॉलनी स्टॉप ते सागर अपार्टमेंट या महत्त्वाच्या मार्गावर तर रस्ता अस्तित्त्वातच नाही.

यापूर्वी मनसेने आंदोलन, निवेदने आणि फॉलोअपनंतरच पथदिवे आणि कचरा संकलनाची व्यवस्था सुरू झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र इतक्या वर्षांत निवडून आलेल्या नगरसेवकांनी या भागातील मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले, हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

दरम्यान, आजच्या भेटीदरम्यान उपमहानगराध्यक्ष मेंगडे यांनी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सोमवारपर्यंत गटारी स्वच्छता आणि साफसफाई सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र हे आश्वासनही फक्त कॅमेऱ्यासमोरचे आहे की प्रत्यक्ष कामात उतरते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची “अजून झोप” — की नागरिकांनी पुन्हा निवडणुका येईपर्यंत थांबावे? हा सवाल आजच्या भेटीनंतर अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहेया कार्यक्रमात उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विभाग अध्यक्ष उमेश अठरे, विकास पात्रे, निलेश पाटील, महिलांसह कॉलनीतील रहिवासी आणि मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button