ताज्या बातम्या
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार धोकादायक १५ रोहित्रांवरील सुरक्षेची कामे पूर्ण ! उर्वरित रोहित्रांवरील कामेही युद्धपातळीवर
जळगाव : महापालिका आयुक्त आदित्य जिवने (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार महावितरणने शहरातील धोकादायक व जीर्ण रोहित्र (डीटीसी) वितरण पेट्यांची दुरुस्ती, नवीन पेट्या बसविणे, उघड्या पेट्यांना दरवाजे लावणे तसेच कमी उंचीवरील वितरण पेट्या सुरक्षित उंचीवर बसविण्याची कामे हाती घेतली.
दि. १ व २ जुलै २०२६ रोजी शहरातील एकूण १५ रोहित्रांवरील सुरक्षाविषयक कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून विद्युत अपघाताचा धोका कमी होणार आहे. उर्वरित रोहित्रांवरील कामेही युद्धपातळीवर सुरू असून ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने मनपाला दिली आहे.