छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन लाखाची जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना तीन लाखाची लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले
खाजगी पंटरच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने स्वीकारली तीन लाखांची लाच ; दोघेही अटकेत !
छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन लाखाची जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना तीन लाखाची लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले
आज छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन लाखाची लाच पंटर करवी स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. या कारवाईमुळे आरटीओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याला नवापूर चेकपोस्टवर बदली करण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी खाजगी पंटर भिकन मुकुंद भावे मार्फत मागितली होती.
परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबीच्या पथका सोबत संपर्क साधला. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
त्यानुसार आज दुपारी साडेतीन वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजी नगरच्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. खाजगी इसम भिकन भावे यांनी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती देखील एसीबीच्या पथकाने दिली.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे एसीबीचे डीवायएसपी सुरेश नाईकनवरे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे येथील घरांची झाडाझडती देखील एसीबी चे पथक घेत असल्याचे कळते.