जळगाव महापालिकेला नवे आयुक्त; आदित्य जीवने यांची नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या फेरबदलांत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदाच्या बदल्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशातून या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणमध्ये संयुक्त संचालक (जॉइंट डायरेक्टर) म्हणून कार्यरत असलेले आदित्य जीवने आता जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणार आहेत. तर विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असली, तरी त्यांची पुढील नियुक्ती नेमकी कुठे करण्यात आली आहे, याबाबतच्या आदेशात अद्याप स्पष्टता झालेली नाही.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जळगाव महापालिकेच्या खळबळ उडाली आहे.