ताज्या बातम्या

मनपा स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; उपमहापौर चौधरींसह सर्व पदाधिकारी-नगरसेवकांनी केलेले अभिष्टचिंतन


प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या राजकारणात आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महानगरपालिकेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत शहराच्या विकासासाठी विविध विषयांवर सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक म्हणून डॉ. पाटील यांची ओळख आहे. त्यांची जळगाव मनपा स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यापासून, जबाबदारीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला आर्थिक नियोजनाची दिशा देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

स्थायी समिती सभापती म्हणून डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी नुकताच जळगाव शहर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ चा अंदाजित अर्थसंकल्प सादर केला. शहराच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत तयार करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि डिजिटल प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला आहे.

शहरातील रस्ते, नागरी सुविधा, आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनपाचे प्रशासन अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देतानाच संपूर्ण जळगाव शहराच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवून डॉ. पाटील काम करीत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे आणि नागरिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेतील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे आणि नागरिकांच्या अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.

स्थायी समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शहराच्या आर्थिक नियोजनात पारदर्शकता, विकासकामांना गती आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देण्यावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.

वाढदिवसानिमित्त डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी तसेच जळगाव शहराच्या विकासासाठी त्यांच्या हातून अधिकाधिक विधायक कार्य घडावे, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त होत आहेत.

जळगाव शहराच्या विकासाच्या वाटचालीत डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे योगदान अधिकाधिक बळकट व्हावे आणि त्यांच्या नेतृत्वातून शहराला विकासाची नवी दिशा मिळावी, असे महानगरपालिकेचे उपमहापौर चौधरी यांनी डॉ. चंद्रशेखर पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button