ताज्या बातम्या

जळगाव शहरात अल्पदरात अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्यांची सुविधा; गरजू रुग्णांना मोठा दिलासा

२०१९ पासून जळगावकरांच्या सेवेत जी.एम. डायग्नोस्टिक सेंटर; अत्याधुनिक तपासण्या अल्पदरात उपलब्ध


जळगाव : जी.एम. डायग्नोस्टिक सेंटर आणि ओम साई ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या माध्यमातून जळगाव शहरातील नागरिकांसाठी अल्पदरात अत्याधुनिक वैद्यकीय निदान तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील २०१९ पासून शहरात ही सेवा सुरू असून, पंचमुखी हनुमान रोडवरील महानगरपालिकेच्या नानीबाई अग्रवाल रुग्णालयाच्या मागील बाजूस हे केंद्र कार्यरत आहे.

क्रस्ना डायग्नोस्टिक्स ही पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी आणि विविध वैद्यकीय निदान सेवा देणारी कंपनी आहे. या केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध तपासण्या तुलनेने माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गरजू रुग्णांना त्याचा मोठा फायदा होत आहे.“ यामध्ये CGS दरानुसार (सरकारी निर्धारित दरात) विविध वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.” सकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत सेवा सुरू असते.

केंद्रात डिजिटल एक्स-रे ६९ रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत, अत्याधुनिक स्लाइस सीटी स्कॅन १,१७० रुपयांपासून, तर सोनोग्राफी तपासणी ३७६ ते ६५० रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील अत्याधुनिक पॅथॉलॉजी विभागात विविध प्रकारच्या रक्त तपासण्या अल्पदरात उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय तपासण्यांचा खर्च कमी करण्यास मदत होत आहे.

याबाबत केंद्राचे सेंट्रल मॅनेजर इब्राहिम शेख यांनी माहिती देताना सांगितले की, अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जळगाव शहरातील तसेच परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरांमध्ये काही प्रमाणात कमी-जास्त तफावत असू शकते. त्यामुळे रुग्णांनी केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित तपासणीचे अद्ययावत शुल्क व उपलब्ध सुविधांची चौकशी करूनच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये  खालील नंबर वर संपर्क करू शकता. मो. +917420014016


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button