ताज्या बातम्या

युवकांसाठी ‘नशामुक्त युवा – विकसित भारत : मिशन RISE’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

माय भारत केंद्र व जिल्हा पोलिस कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने


जळगाव, दि. 12 सप्टेंबर  : माय भारत केंद्र, जळगाव आणि जिल्हा पोलीस कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत : मिशन RISE’ अंतर्गत युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे,डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक,जळगाव कु. सह्याद्री बिरले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड, प्राचार्य, डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय,डॉ. आर. के. नारखेडे,माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी,अभिषेक चवरे तसेच जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक,डॉ. राजू गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातून माय भारतचे युवा स्वयंसेवक उपस्थित होते. सुमारे 200 युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणादरम्यान कु. सह्याद्री बिरले यांनी अमली पदार्थ म्हणजे काय, अमली पदार्थांचे विविध प्रकार, अमली पदार्थांचा मेंदूवर होणारा परिणाम तसेच तरुणाई व्यसनाकडे का वळते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच NDPS Act मधील कलम 27, 21, 22, 37, 106, 35 व 54, कायद्याच्या दृष्टीने ड्रग्सची संकल्पना, कायदेशीर अभय व उपलब्ध मार्ग तसेच कलम 64-A याबाबत सविस्तर माहिती दिली.

व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवकांची भूमिका यावरही मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण घेतलेले हे युवा स्वयंसेवक पुढील काळात आपले मित्र, इतर युवक तसेच शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करतील. या माध्यमातून नशामुक्त युवा आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवा शक्तीचा सकारात्मक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी
विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले व अमली पदार्थ, व्यसन आणि कायद्याशी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. हर्षाली पाटील यांनी केले तर कृष्णा पुरोहित यांनी आभार व्यक्त केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button