ताज्या बातम्या

महावीर आईस्क्रीमवर मनपाची कारवाई; ८ किलो प्लास्टिक जप्त, ५ हजारांचा दंड ! आणि रात्री उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर मनपाची धडक कारवाई


प्रतिनिधी: जळगाव शहरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत रात्री विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.  आयुक्त श्री. आदित्य जीवने उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्या आदेशान्वये तसेच श्री. समीर बोरोले , सहाय्यक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली सदर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.ही मोहीम रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात आली.

काव्य रत्नावली चौक, एम. जे. कॉलेज परिसर, फ्रूट गल्ली, पोलीस पेठ, सिद्धी कॉलनी, स्टेडियम, रेल्वे स्टेशन व नवी पेठ परिसरात हॉकर्स व व्यावसायिकांची तपासणी केली जात आहे. व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच प्रतिबंधित एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर, साठवणूक, विक्री व वितरण आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विसनजी नगर येथील महावीर आईस्क्रीम येथे तपासणी केली असता ८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. याप्रकरणी ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई शाखा अभियंता समीर बोरोले, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील व रूपेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक मयूर सपकाळे, प्रदीप धापसे, महेश ठाकूर व मुकादम यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

नागरिक व व्यावसायिकांनी ओला-सुका कचरा वेगळा करून अधिकृत कचरा संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द करावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे तसेच नाल्यात किंवा जलवाहिनीत कचरा टाकू नये, असे आवाहन स्वच्छता विभागाने केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button