Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

शहरात शिव कॉलनीत ‘एमडी’ तस्कर जेरबंद; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त.


प्रतिनिधी जळगाव  दि.२९ : रामानंद नगर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत शिव कॉलनीतील मातोश्री हॉटेल परिसरातून एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ विक्रीसाठी थांबलेल्या एका संशयिताला अटक केली. त्याच्याकडून ५ ग्रॅम एमडी, मोबाईल व दुचाकीसह एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक २८ तारखेच्या रात्री गस्तीवर असताना, शिव कॉलनीतील हॉटेल मातोश्रीजवळ एक इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवर संशयितरीत्या थांबला असल्याची अत्यंत गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नायब तहसीलदार, फॉरेन्सिक पथक, पंच व व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत सापळा रचून कल्पेश रायसिंग (वय २६, रा. शेंदणी वालकी, ता. चोपडा) याला ताब्यात घेतले. त्याच्या सीबी युनिकॉर्न दुचाकीच्या सीटखाली लपवून ठेवलेल्या ७ पुड्यांमध्ये ५ ग्रॅम एमडी आढळून आले.

या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा अमली पदार्थ जळगावात कोणाला पुरवला जाणार होता आणि त्यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button