धावत्या रेल्वेतून पडलेल्या चिमुकलीला पॉक्स बॉयने दिले जीवदान; जळगाव रेल्वे स्थानकावरील घटना
जळगाव : जळगावहून मथुराकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान एका कुटुंबातील लहान मुलगी धावत्या ट्रेनमधून जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पडल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. यावेळी रेल्वे स्थानकावर कार्यरत पॉक्स बॉय भरत याने तत्परतेने धाव घेत मुलीला उचलून घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल हसन (रा. हजरतपुरी, जि. बदायूं, उत्तर प्रदेश) हे पत्नी रविना अब्दुल हसन (२५) आणि मुलगी सलाना अब्दुल हसन यांच्यासह जळगावहून मथुराकडे( ट्रेन नंबर 12627 प्रवास करत होते. मुलगी मागील जनरल कोचमधून प्रवास करत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर धावत्या ट्रेनमधून खाली पडली.
मुलगी पडल्याचे लक्षात येताच पॉक्स बॉय भरत याने प्रसंगावधान राखत तातडीने तिला उचलले. त्यानंतर आवश्यक ती मदत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.