Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

महापालिकेची परवानगी न घेता गरबा प्रशिक्षणाचा ‘उद्योग’?बॅनरवर प्रवेश शुल्क ३०० रुपये; नगरसेवकांचाही उत्स्फूर्त सहभाग…


जळगाव : शहरातील निवृत्ती नगर, मुक्ताई नगर येथील ‘लोकप्रिय नवरात्र दुर्गोत्सव मित्र मंडळ’ व ‘सेवा फाउंडेशन अकोला-जळगाव विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान भव्य गरबा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये आकारण्यात येणार असल्याचे बॅनरवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदर बॅनर मानराज पार्क रस्त्याच्या मध्ये चौकात चक्क हायवेवर खांबाला लावले आहे.

ग्रीन बॉक्स टर्फ, दादावाडी स्टॉप, नॅशनल हायवे क्रमांक ६, जळगाव येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हे प्रशिक्षण होणार असल्याचे बॅनरवर नमूद आहे. बॅनरवर सौ. अपेक्षा राहुल चौधरी यांचे आयोजक म्हणून, तर सौ. जयश्री राहुल पाटील (नगरसेविका) व श्री. मंगेश चितळे यांचे सहकार्य म्हणून नाव देण्यात आले आहे.

मात्र, सदर बॅनरसाठी जळगाव महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का?, तसेच शुल्क आकारून आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिकेचा महसूल का दिला नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

“तुम्ही पैसे कमवा आणि शासनाचा महसूल बुडवा ?” असा संतप्त सवाल होत आहे. बॅनरची संबंधितांकडून परवानगी घेतली आहे की नाही, याची महापालिका प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. कारण बॅनरवर दिनांक पावती क्रमांक टाकणं बंधनकारक असल्यावर सुद्धा ते दिसून आले नाही, या आयोजनात नगरसेवकांचाही सहभाग असल्याच दिसत आहे, त्यामुळे प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका प्रशासनाने बॅनरची परवानगी, शुल्क आकारण्यासंदर्भातील नियम आणि कार्यक्रमाच्या आयोजनाची अधिकृतता तपासून आवश्यक असल्यास कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button