ताज्या बातम्या

भारत आदिवासी पार्टी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड यांना चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर.

इतिहासात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामधून भिल्ल समाजातून आमदारकीसाठी सुनील भाऊ गायकवाड यांनी तयारी केली आहे.


सुनील भाऊ गायकवाड हे आदिवासी एकता परीक्षेचे राज्यसचिव असून गेल्या वीस वर्षापासून आदिवासी एकता परिषद मार्फत आदिवासींसाठी काम करीत आहेत त्यांच्या कामाला आज रोजी सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी न्याय दिला आहे तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये चोपडा विधानसभे मार्फत सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी आज पत्रकार परिषद मध्ये सुनील भाऊ गायकवाड यांचे विधानसभेसाठी नाव जाहीर केले तसेच येणाऱ्या 30 सप्टेंबर रोजी आदिवासी नेते आणि भारत आदिवासी पार्टीचे विद्यमान खासदार सन्माननीय राजकुमार राऊत साहेब आणि सध्या प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची मोठी जनसभा चोपडा येथे नगरपालिका स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली आहे हे संपूर्ण आयोजन श्री सुनील भाऊ गायकवाड यांनी केलेले आहे त्यांची चोपडा विधानसभा मतदारसंघात जोरात तयारी चालू आहे कारण चोपडा विधानसभा मतदारसंघ हा एसटी राखीव असून पहिल्यांदाच कुणी भिल्ल समाजाच्या व्यक्ती आमदारकी लढणार आहे असा समाज की जो खूप गरीब म्हणून गणला जातो अशा समाजातून आजपर्यंत कोणीही आमदारकीसाठी लढलेले नाही इतिहासात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामधून भिल्ल समाजातून आमदारकीसाठी सुनील भाऊ गायकवाड यांनी तयार केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button