Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

रामानंद नगर पोलिसांची कामगिरी; मोटारसायकल चोर अटक, चोरीची दुचाकी जप्त


जळगाव : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या काही तासांत हस्तगत करत पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, खंडेराव नगर परिसरात राहणारे ज्ञानेश्वर उखा भोई यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्रमांक MH-19-AS-5224) ही घरासमोर लावली असता, अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दि. 25 जानेवारी 2026 रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 22/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला कार्यरत केले.

तपासादरम्यान पोलीस हवालदार सुशील चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमीन शाह जहूर शाह (रा. न्यू दुध फेडरेशन, पिंप्राळा हुडको, जळगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास संशयावरून दि. 25/01/2026 रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाकडून आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

पोलीस कोठडीत सखोल तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (MH-19-AS-5224) पोलिसांकडे काढून दिली. सदर वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

या यशस्वी कारवाईत रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी तसेच चालक पोलीस नाईक संदीप बि-हाडे यांनी सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सुशील चौधरी (रामानंद नगर पोलीस ठाणे, जळगाव) करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button