ताज्या बातम्या

प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपचा जोरदार प्रचार; गायत्री इंद्रजीत राणेंसोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

प्रभाग क्रमांक १२ (अ) मधून अनिल सुरेश अडकमोल, १२ (क) मधून गायत्री इंद्रजीत राणे तर १२ (ड) मधून नितीन मनोहर बरडे हे भाजपचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात


जळगाव प्रतिनिधी: जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार प्रचार मोहिम राबविण्यात येत असून, भाजप उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक १२ (अ) मधून अनिल सुरेश अडकमोल, १२ (क) मधून गायत्री इंद्रजीत राणे तर १२ (ड) मधून नितीन मनोहर बरडे हे भाजपचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होत आहेत.

या प्रचार दौऱ्याचे नेतृत्व भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच भाजप जळगाव मंडळ क्रमांक ३ चे सरदार वल्लभभाई पटेल मंडळ (रामानंद नगर व महाबळ परिसर) अध्यक्ष अजित राणे यांच्यासह फालक काका, वैशालीताई पाटील, अक्षय चौधरी, नीला चौधरी, सुनिल पाटील, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, रोहीत देवरे, अजय चौधरी, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, तन्मय राणे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलु शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, आशिष सपकाळे, खुशाल महाजन, संकेत कापसे, निरज बरडे, अजिंक्य पाटील, संतोष भंगाळे, ललित पाटील, सुदर्शन चौधरी व संतोष पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा प्रचार दौरा साने गुरुजी कॉलनी, टेलिफोन नगर, श्रद्धा कॉलनी, समित्र कॉलनी व इंद्रप्रस्थ नगर या भागांमध्ये पार पडला. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत भाजप उमेदवारांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत, पुढील पाच वर्षांसाठी सक्षम, पारदर्शक व विकासाभिमुख नेतृत्व देण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले.

प्रचारादरम्यान नागरिकांनीही आपले प्रश्न, समस्या मांडल्या असता, त्या मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button