मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने विनम्र अभिवादन व वृक्षारोपण , फळ वाटप , व शालेय साहित्य वाटप
प्रतिनिधी २२ जुलै : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री ना .अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हा पक्ष कार्यालय आकाशवाणी चौक येथे फोटोच्या प्रतिमेला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रमोद पाटील व महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते हार घालून व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले
त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पक्ष कार्यालय जवळ विविध एकविस वृक्षारोपण करुन जळगाव येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे शालेय साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नियोजन व मनोगत व्यक्त जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी केले
वरील सर्व कार्यक्रमाला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील , महानगर जिल्हा अध्यक्ष अशोक एस लाडवंजारी , प्रदेश सरचिटणीस ईजाजभाई मलिक , जिल्हा समन्वयक विकास पवार , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ मंगलाताई पाटील , अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मजहरभाई पठाण , जेष्ठ कार्यकर्ते विलासभाऊ पाटील , युवक महानगर जिल्हाअध्यक्ष विनायक पाटील , युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील , माजी नगरसेवक राजू मोरे , माजी नगरसेवक जिल्हा सरचिटणीस सुनिल भैय्या माळी ,जिल्हा उपंअघ्यक्ष किरण राजपूत , ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष गिरीश सांगळे वंजारी , सुहास चौधरी , संजय जाधव , जिल्हा उपंअघ्यक्ष मोहसीनभाई शेख , कार्यालय मंत्री सतिश चौव्हाण , फराह शेख इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते