छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकून, विजयाचा जल्लोष केला होता ! इथे मात्र लढाईविना च विजयाचा जल्लोष!” आणि घोषणा मात्र महाराजांच्या
महाराजांचा विजय संघर्षातून; जळगावात मनपा निवडणुकीत बिनविरोध ‘विजय’ वादात” महाराजांचा लढाऊ लोकशाहीचा वारसा; पण बिनविरोध निवडींनी मतदारांचा हक्क गमावला?”
जळगाव प्रतिनिधी: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत माघारीच्या वेळात तब्बल तब्बल बारा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची चर्चा सध्या शहरात सर्वत्र सुरू आहे. हे उमेदवार बिनविरोध कसे आले, यामागची कारणेही आता जळगावकरांच्या लक्षात आली आहेत.
या प्रक्रियेत काहींना आनंदाश्रू अनावर झाले, तर काहींनी उघड जल्लोष साजरा केला.मात्र या जल्लोषादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पाया पडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. इतिहास साक्षी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक विजय लढाई लढून, अपार त्याग व पराक्रमाने मिळवला. युद्ध जिंकल्यानंतरच त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला.
येथे मात्र निवडणुकीच्या रणांगणात प्रत्यक्ष न लढता ‘आम्ही जिंकलो’च्या घोषणा दिल्या जात असल्याने, हा विजय लोकशाही मूल्यांशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही प्रभागांतील नागरिकांना आपला प्रतिनिधी पसंत आहे की नाही, हे ठरवण्याचा मूलभूत अधिकारच मतदारांकडून हिरावला गेला आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संघर्ष, पराक्रम आणि लोकसमर्थनातून मिळालेल्या विजयाचा साक्षीदार आहे. प्रत्येक युद्ध जिंकल्यानंतरच त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. कोणताही विजय हा लढाई, रणनीती आणि जनतेच्या पाठिंब्याशिवाय मिळत नाही, हे महाराजांच्या जीवनातून स्पष्ट होते.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने निवडणूक कायद्यात केलेल्या महत्त्वाच्या बदलानुसार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला तत्काळ न्यायालयात आव्हान देता येत नाही. याच तरतुदीचा परिणाम म्हणून बिनविरोध निवडींच्या घोषणा वेगाने आणि कोणत्याही अडथळ्याविना झाल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रश्न उभा राहतो की, ही लोकशाहीवर झालेली गदा आहे की काय?
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनीच यावर स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची दखल घेत निवडणूक आयोगाने सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि लोकशाहीतील ‘निवडणुकीचे युद्ध’ यांची तुलना करताना संवेदनशीलता आणि जबाबदारी आवश्यक असल्याची भावना आता सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे.