ताज्या बातम्या

योगेश अडकमोल यांना राज्यस्तरीय ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर अधिवेशनात राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे व माजी मंत्री नितीन राऊ यांच्या हस्ते सन्मान; जळगावच्या कर्मचारी संघटन क्षेत्रात आनंदाचे वातावरण


जळगाव : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या संघटनात्मक कार्यात भरीव योगदान देणारे महासंघाचे तत्कालीन कार्याध्यक्ष योगेश दादा अडकमोल यांना २०२५ या वर्षातील प्रतिष्ठेचा ‘कास्ट्राईब शिलेदार’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

योगेश अडकमोल यांनी शासकीय कर्तव्ये पार पाडतानाच संघटनेच्या वाढीसाठी प्रचार, प्रसिद्धी आणि संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला. त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे तसेच संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांची ‘कास्ट्राईब शिलेदार’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष मा. कृष्णा इंगळे आणि राज्याचे माजी मंत्री तथा आमदार मा. नितीन राऊ यांच्या हस्ते योगेश अडकमोल यांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्य पदाधिकारी गणेश मडावी, सुमित भुईगळ, सुरेश तांबे, प्रभाकर सोनडवले आदी उपस्थित होते. अडकमोल यांच्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्यातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेल्याने त्यांच्या योगदानाचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या सन्मानाबद्दल कास्ट्राईबचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, जिल्हाध्यक्ष पुलकेश केदार, प्रा. प्रमोद लोंढे, नंदू गायकवाड, राकेश निकुंभे, रोहित पावरा, विकास सोनवणे, योगीराज तेली, एच. डी. बनगे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विज्ञान सैदाने, पाटबंधारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, विलास डोंगरे, महेश सपकाळे, रुपेश ठाकूर, सिद्धांत बडगे, भास्कर घुले, जीभाऊ हटकर, सुरेश भालेराव, साधना बाविस्कर, किशोर महिराळे, रवींद्र गायकवाड, सुरेश वाडे, मंदा मोरे, सोनाली बारेला आदींनी योगेश अडकमोल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button