ताज्या बातम्या

वंदे मातरम्’राष्ट्र गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त जळगावात २० राेजी भव्य जिल्हास्तरीय सोहळा

सांस्कृतिक मंत्रालय आणि केवलाई फाउंडेशनचा उपक्रम; २१ राेजीही विविध कार्यक्रम हाेणार


जळगाव – दि १८- भारतमातेच्या अपार प्रेरणेचा स्रोत असलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालय (भारत सरकार) व केवलाई फाउंडेशन, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २० नाेव्हेंबर राेजी सकाळी ९ वाजता स्टेडियम शेजारील पोलिस पद्मालय हॉल येथे भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सामूहिक वंदे मातरम् गायन, व्याख्याने व परिसंवाद, विद्यार्थी स्पर्धा व पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला प्रदर्शन आदीचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे असतील. उद‌्घाटन क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदच्या सीईओ करिश्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, महापौर दिपमाळा काळे, उपमहापौर मनोज चौधरी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त ओबीसी बहुजन कल्याण विशाल राठोड, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, योगेश देसले हे उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केवलाई फाउंडेशनचे अध्यक्ष आबा पाटील व कार्यकारी मंडळाने केले आहे.

दाेन दिवस हे हाेणार कार्यक्रम…..२० व २१ राेजी हाेणाऱ्या दोन दिवसीय सोहळ्यात २० राेजी पाेलिस हाॅल येथे सामूहिक वंदे मातरम् गायन, व्याख्याने व परिसंवाद, विद्यार्थी स्पर्धा व पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी प्रदर्शनी व माहिती दालन हे कार्यक्रम हाेतील. तर २१ राेजी सकाळी ८ वाजता मानवसेवा माध्यमिक विद्यालयात पथनाट्य, चित्रकला व रांगाेळी स्पर्धा हाेणार आहे.

अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा….

२० राेजी सकाळी ९ वाजता नोंदणी व स्वागत, १० वाजता उद्घाटन, १०.१५ वाजता सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन (विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग), १०.३० वाजता मान्यवरांचे मनोगत, ११.३० वाजता ‘वंदे मातरम् : इतिहास, प्रेरणा आणि आजचे राष्ट्रीय महत्त्व’ यावर विशेष व्याख्यान / परिसंवाद, दुपारी १२ वाजता देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button