Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

JCL T-20 मध्ये रोमांच शिगेला; सातपुडा हिरोज, कोगटा किंग्स आणि सुहांस जायंट्स विजयी.


जळगाव, दि.21 (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित JCL T-20 स्पर्धेत सामने रंगतदार होत असून उपांत्यफेरीसाठी चुरस वाढली आहे. मंगळवारी जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स यांनी विजय मिळवला, तर सोमवारी अमळनेर सुहांस जायंट्सने बाजी मारली.

जामनेर सातपुडा हिरोजने अमळनेरवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रद्युम महाजन (69) याच्या दमदार खेळीमुळे जामनेरने १५३ धावांचे लक्ष्य १७.४ षटकांत पार केले.

जळगाव कोगटा किंग्सने रावेर रॉयल्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. ओम भोसले (64*) आणि बिपिन चांगरे (52) यांच्या फलंदाजीमुळे संघाने 144 धावांचे लक्ष्य 15.1 षटकांत गाठले.दरम्यान, अमळनेर सुहांस जायंट्सने रावेर रॉयल्सवर २०१ धावांचा मोठा स्कोर उभारून ३७ धावांनी विजय मिळवला. रणजीत निकम (55) सामनावीर ठरला.

स्पर्धेतील गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स प्रत्येकी ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button