Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगाव मनपा निवडणूक 2025-26 : निवडणुकीत 53.59% मतदान, एकूण 2 लाख 34 हजारांहून अधिक मतदारांनी बजावला हक्क


जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदारांचा अल्प प्रतिसाद, 53.59 टक्के मतदानाची नोंद

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली. शहरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे गर्दी केली.

दिवसभराच्या मतदानात पुरुष मतदार 1,22,858, स्त्री मतदार 1,12,133, तर इतर प्रवर्गातील 5 मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये एकूण 2,34,996 मतांची नोंद झाली असून शहराचा एकूण मतदान टक्का 53.59% इतका राहिला आहे.

विशेष म्हणजे, दुपारनंतर अनेक प्रभागांमध्ये मतदारांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय ठरला.

प्रशासनाकडून मतदानासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जळगाव शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला लवकरच होणार आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button