एकनाथ खडसेंच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; रुग्णांना फळवाटप
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव महानगरच्या वतीने लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात १०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाऊ पठाण होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजू मोरे, सुनील माळी, नामदेव वाघ, गिरीश सांगळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, विद्यालयाचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या आयोजनातून मेडिकल कॅम्प घेण्यात आला. अशा विविध सामाजिक उपक्रमांतून खडसेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.