Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

मनपा आयुक्त आदित्य जिवने यांचा शहरभर स्वच्छता व विकासकामांचा पाहणी दौरा

पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या स्वच्छतेला गती; आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश


जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवने यांनी २७ जून २०२६ रोजी शहरातील स्वच्छता, नाला स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन तसेच अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.

सम्राट कॉलनी (टी.एम. नगर) व खंडेराव नगर येथील कचरा संकलन केंद्रांना भेट देऊन कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, दुर्गंधी नियंत्रण व नियमित देखभालीबाबत सूचना दिल्या. त्यानंतर नेरी नाका, सालार नगर, ममुराबाद रोड व बिबा नगर येथील नाल्यांची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी नाल्यांची नियमित स्वच्छता, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, हरितक्षेत्र विकास व संरक्षण भिंत उभारण्याचे निर्देश दिले.

दादावाडी परिसरातील अमृत भुयारी गटार योजनेच्या कामांचाही आढावा घेऊन कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी शहर अभियंता, संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button