Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्णतेमुळे जळगाव RTO कार्यालयाच्या वेळेत तात्पुरता बदल

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने RTOचा महत्त्वाचा निर्णय


जळगाव : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) अपॉइंटमेंटच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. आता लायसन्स चाचणी, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच कच्ची व पक्की अनुज्ञप्ती संबंधित कामांसाठी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतच अपॉइंटमेंट दिल्या जाणार आहेत.पूर्वीची वेळ बदलून ही नवीन वेळ लागू करण्यात आली असून नागरिकांनी त्यानुसारच अपॉइंटमेंट घ्याव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी केले आहे.

वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होऊ नये आणि आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button