ताज्या बातम्या

जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह २६ अधिकारी-अंमलदारांना पोलीस पदके जाहीर; पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.


जळगाव, दि. 14 ऑगस्ट 2026 : जळगाव पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी बजावलेल्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी विविध पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये जळगाव पोलीस दलातील एकूण 26 अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यात आला आहे.

यामध्ये अति उत्कृष्ट सेवा पदक – 09, उत्कृष्ट सेवा पदक – 14, विशेष सेवा पदक – 01 तसेच पोलीस पदक – 02, अशा एकूण 26 पदकांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. श्रीकांत धिवरे, IPS यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदारांचा या यादीत समावेश आहे.

दीर्घकालीन, प्रामाणिक व निष्कलंक सेवेतून पोलीस दलाची कार्यक्षमता, शिस्त व जनसेवेची बांधिलकी अधिक दृढ करणाऱ्या सर्व पदकविजेत्या अधिकारी व अंमलदारांचे जळगाव पोलीस दलातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या उल्लेखनीय सेवेला हा गौरवपूर्ण सन्मान असल्याचे यानिमित्ताने नमूद करण्यात येते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button