ताज्या बातम्या

आज संविधान दिनानिमित्त, आपण केवळ हक्कांची आठवण न ठेवता, कर्तव्यांची जाणीवही तितकीच मजबूत करूया.


भारताचे संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर स्वातंत्र्यानंतर देशाला दिलेली एक अमूल्य दिशा आहे. विविध भाषा, धर्म, संस्कृती यांचा संगम असलेल्या भारताला एकत्र बांधणारा धागा म्हणजे संविधान. नागरिकांच्या हक्कांपासून कर्तव्यांपर्यंत, शासनाच्या रचनेपासून न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेपर्यंत प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगणारा हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे.

संविधानाने प्रत्येक भारतीयाला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांची हमी दिली. कोणताही नागरिक छोटा–मोठा नाही, कोणावरही अन्याय होऊ नये, प्रत्येकाला संधी समान मिळावी हे तत्त्व संविधान जपते.

आज संविधान दिनानिमित्त, आपण केवळ हक्कांची आठवण न ठेवता, कर्तव्यांची जाणीवही तितकीच मजबूत करूया. कारण नागरिक जबाबदार असतील तेव्हाच संविधानाचे खरे सामर्थ्य देशाला पुढे नेते.

संविधान जपा,
लोकशाही मजबूत करा…

भारताला पुढे नेणाऱ्या ,
मूल्यांचे रक्षण करा…!

शब्दांकन: ॲड जमील देशपांडे

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button