ताज्या बातम्या

चित्रपटातील नाही, तर जळगाव पोलिसांचा खरा ‘हिरो’ ठरलेला श्वान झाला सेवामुक्त.

“जंजीर”चा सेवानिवृत्ती सोहळा; पोलीस दल भावुक !


जळगाव – जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला विश्वासू आणि कुशल श्वान “जंजिर” याचा सेवानिवृत्तीचा समारंभ  दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक सो. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी पो.उपनि. देविदास वाघ, तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे, पोहेकॉ संदीप परदेसी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्वान “जंजिर”चा जन्म १८ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला असून, त्याने गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नऊ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ०७ एप्रिल २०१८ रोजी तो जळगाव जिल्हा पोलीस दलात दाखल झाला.

गत सात वर्षांच्या सेवाकाळात, जंजिरने चाळीसगाव, MIDC, भुसावळ शहर तसेच जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत कार्य करत अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेण्यात मोलाची भूमिका बजावली. गुन्हे उकलण्यात त्याच्या सुगंध शोध क्षमतेमुळे पोलीस दलाला अनेक गुन्ह्यांचा तपास सोपा झाला.

सेवानिवृत्ती प्रसंगी जंजिरला फुलांचा हार, बिस्कीट आणि केक देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्याच्या निष्ठावान सेवेचा गौरव करत भावनिक शब्दांत निरोप दिला.

श्वान जंजिरने जळगाव जिल्हा पोलीस दलाचा अभिमान वाढवला असून, त्याची सेवा सदैव प्रेरणादायी राहील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button