समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हा मध्य विभागाची १५ जुलै रोजी महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक
जळगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या विचारांचा प्रसार, संघटना अधिक सक्षम करणे आणि जळगाव जिल्हा मध्य विभागाची प्रभावी उभारणी करण्याच्या उद्देशाने १५ जुलै २०२६ रोजी जळगाव शहरात महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे दुपारी १२.०० वाजता होणार असून, समता सैनिक दलाचे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तर राज्य संघटक विजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समता सैनिक दलाबाबतची संकल्पना, उद्दिष्टे व ध्येय, दलाचा इतिहास, वर्तमानातील जबाबदाऱ्या, भविष्यातील संघटनात्मक दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, धरणगाव व जामनेर या भागांसाठी जळगाव जिल्हा मध्य विभागाची कार्यकारिणी निवड, सदस्य नोंदणी, शाखा विस्तार, प्रशिक्षण, जनजागृती आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावरही चर्चा होणार आहे.
समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सैनिक तसेच आंबेडकरी विचारांचे अनुयायी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जळगाव जिल्हा मध्य विभाग प्रचारक समितीतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क: ९९२१३२३२८१, ७२४९०२४१४१.