Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

आरटीओतील व्हिडीओने खळबळ; लेखाधिकारी महाजनांना खुलासा नोटीस ! ऑफिस टाईम’नंतर कामाचा व्हिडिओ नंतर प्रशासनाने काढला नियमित वेळेचा आदेश;


जळगाव : प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयातील कार्यालयीन वेळेनंतर एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून संगणकावर काम करून घेतले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर आरटीओ प्रशासनाने याची दखल घेतली आहे. या प्रकरणी लेखाधिकारी सतीश महाजन यांना लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी ही नोटीस काढली आहे. नोटीसमध्ये २८ ऑगस्ट २०२६ रोजी ‘जनतालाईव्ह’ या फेसबुक चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ क्लिपचा संदर्भ देण्यात आला आहे.

नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी श्री. चौरे हे संगणकावर काम करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. तसेच, संबंधित कर्मचारी वेतनविषयक कामासाठी लेखाधिकारी सतीश महाजन यांचे काम करीत असल्याचे संभाषणात नमूद असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकाराबाबत तात्काळ कार्यालयात लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश लेखाधिकारी सतीश महाजन यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या नोटीसमुळे आरटीओ कार्यालयातील कार्यालयीन वेळेनंतरच्या कामकाजाबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button