१०० खाटांचे हॉस्पिटल की १०० किलो कचऱ्याचा डेपो? मोहाडी रोडच्या रुग्णालयातील अस्वच्छतेने आरोग्यव्यवस्थेला चपराक”
“दवाखाना आहे की दुर्गंधीचा कारखाना? मोहाडी रोड रुग्णालयातील अस्वच्छतेवर वैद्यकीय अधीक्षक यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी जळगाव: शहरातील मोहाडी रोडवरील १०० खाटांचे महिला व बाल शासकीय रुग्णालय आधुनिक सुविधांनी सज्ज असले, तरी प्रत्यक्षात रुग्णालयाच्या नावासारखाच अस्वच्छतेचा आकडा “१०० खाटा नव्हे तर १०० किलो कचरा” असा भास निर्माण असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
हॉस्पिटलच्या इमारतीची रंगरंगोटी, फर्निचर, बाह्य देखावा चकचकीत—पण ,आत मात्र मेसेज, शौचालये आणि वेटिंग एरिया च्या बाजूलाच प्रचंड घाण, दुर्गंधी, कचरा व अव्यवस्था पाहायला मिळाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पेशंट व त्यांचे नातेवाईक स्वच्छतेविषयी अनभिज्ञ असतील का, की येथील सफाई कर्मचारी कामच करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो. याहून गंभीर म्हणजे सीनियर डॉक्टर्स आणि अधिक्षकांकडून अशा परिस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही अनेकांनी केली आहे.
आरोग्यसेवा देणाऱ्या शासकीय दवाखाने अशी मूलभूत स्वच्छता नसल्याने रुग्ण सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घाणीमुळे आजारांना आमंत्रण मिळत असते. याची तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
