ताज्या बातम्या

“शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर”


जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

जिल्हा परिषदेच्या एका मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळलेल्या दोन कुत्रे सांभाळण्याची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्याना देण्यात आली आहे, त्यामुळे हे शासकीय कर्मचारी आहे, की खाजगी कर्मचारी आहे, हे कळायला मार्ग नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून उपविभागातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे  यंत्रणेचे दोन कर्मचारी  पाणीपुरवठ्याची कामे न देता, त्यांना अधिकाऱ्यांच्या घरी कुत्रे सांभाळायला नियुक्ती करण्यात आलेली आहे की काय, असे चित्र बघायला मिळाले. वारंवार असे दृश्य दिसल्यामुळे आमच्या प्रतिनिधीने चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.
पाणीपुरवठा विभागाच्या  कार्यालयाचे काम न करता पाळलेल्या दोन कुत्र्यांची सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.

या दोघ पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी सात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत, तसेच संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत या जिल्हा परिषद च्या मुख्य  कार्यकारी अधिकारी यांचे कुत्रे सांभाळण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले असून याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे.

सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था, गावांचा विकास, आणि ग्रामीण जनतेची मूलभूत गरज — यासाठी नेमलेले हे कर्मचारी, अशा वैयक्तिक कामात गुंतलेले असणे म्हणजे शासकीय सेवेचा आणि लोकविश्वासाचा सरळ अपमान होय.
ही बाब केवळ अनुचित नाही, तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस (आचारसंहिता) नियम, १९७९ आणि सेवा शिस्त नियमांनुसार दंडनीय अपराध ठरतो.

‘प्रशासन पारदर्शकतेने काम करावे’ असा संदेश देणाऱ्या यंत्रणेतूनच असा सत्तेचा दुरुपयोग होत असेल, तर मग सामान्य कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा कशी ठेवायची? हे एक संवेदनाहीन प्रशासनाचे उदाहरण ठरते.

लोकसेवकांनी पदाचा उपयोग जनतेसाठी करावा, वैयक्तिक कामासाठी नव्हे — ही मूलभूत संकल्पना विसरल्याने शासनयंत्रणेबद्दलचा विश्वास ढासळतो. जिल्हा परिषदेमधील प्रमुख अधिकारीच जर अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा वापर करत असतील, तर ही बाब केवळ निंदनीय नाही, तर चौकशीयोग्य आणि कारवाईयोग्य आहे.

या घटनेवर जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी तात्काळ चौकशी करून कारवाई करणे हीच लोकसेवेप्रती खरी जबाबदारी ठरेल. कारण “शासनाची सेवा ही जनतेसाठी आहे, कुत्र्यांसाठी नाही.”

सदरील कर्मचाऱ्यांना विचारपूस केले असता, त्यांनी ह्या गोष्टीला होकार देऊन, मान खाली टाकून अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात निघून गेले.

याबाबत zp पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल जाधव यांना याबाबत विचारपूस केले असता त्यांनी सांगितलं की, चौकशी करून तुम्हाला माहिती देतो असे सांगितले. त्यानंतर आमचे प्रतिनिधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारपूस करण्यास गेलो असता ते कामात व्यस्त होते, एक तास थांबून सुद्धा ते भेटले नाही. या घटनेवर  जिल्हाधिकारी तसेच  संबंधित अधिकारी याबाबत चौकशी करतील का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

शोध पत्रकारिता पुढील शोधात.…..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button