ताज्या बातम्या

गिरणा टाकी परिसरातील अतिक्रमण काढले: अतिक्रमित टपऱ्यांच्या आडोशाला चालायचे मद्यपान; संयुक्त कारवाईत भाजीपाला विक्रेत्यांचे मात्र मोठे नुकसान

मद्यपींच्या आडोशातील टपऱ्यांवर अतिक्रमण विभागाची कारवाई !


प्रतिनिधी जळगाव :  शहरातील गिरणा टाकी परिसरातील वाईन शॉपच्या आजूबाजूला वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. विशेषतः हातगाड्या आणि टपऱ्यांच्या आडोशाला तरुणांचे गट रात्री उशिरापर्यंत मद्यपान करत बसत असल्याने परिसरातील शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच दिवसा काही ठिकाणी सट्टा सुरू असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. काही दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मद्यपान करणाऱ्यांना कारवाई करत इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर आज पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत गिरणा टाकी परिसरातील अतिक्रमित 20 हातगाड्या व टपऱ्या जप्त केल्या. संबंधित टपऱ्या बेकायदेशीररीत्या उभारण्यात आल्याचा आरोप असून, त्यांचा वापर रात्री मद्यपानासाठी आडोसा म्हणून वापर होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

मात्र, या कारवाईदरम्यान परिसरातील काही गरीब फळ व भाजीपाला विक्रेत्यांचे छोटे दुकानेही हटविण्यात आल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांनी प्रशासनाने अतिक्रमण हटविताना लहान व्यावसायिकांबाबत संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर हालचालींना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी दुसरीकडे छोट्या विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही पुढे आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button