भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५.४२ लाख रुपयांच्या लुटीचा थरार केवळ ४८ तासांत उकलला
पोलिसांच्या चोख तपासामुळे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा फिर्यादीचा स्वतःचा ड्रायव्हर शाहीद बेग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, २३.४२ लाख रुपये रोख रक्कम व तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन ईरमाइल हे त्यांच्या कार्यालयातील २५.४२ लाख रुपये घेऊन मोटारसायकलने घरी जात असताना, मौजे खडके शिवारात तीन अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवून बॅग हिसकावून पळ काढला.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्याने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली. शाहीदनेच कंपनीतील पैशांच्या ने-आण वेळेची माहिती साथीदारांना दिली होती. त्याच्या साथीदारांमध्ये मुजाहीद मलीक, मोहम्मद दानिश, अजहर मलक, अमीर खान आणि इंजहार बेग यांचा समावेश आहे. या टोळीने एकत्र येऊन गुन्ह्याचा कट रचला आणि प्रत्यक्ष लुटीची घटना घडवली. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम ३१० (२) (दरोडा) वाढवण्यात आले आहे.
शाहीद बेग इब्राहिम बेग (२५, भुसावळ) – मुख्य सूत्रधार, मुजाहीद आसीफ मलीक (२०, भुसावळ) – कट रचणारा ,मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९, भुसावळ) – कट रचणारा,अजहर फरीद मलक (२४, रसलपूर) – प्रत्यक्ष लुटीतील आरोपी, अमीर खान युनुस खान (२४, रसलपूर) – प्रत्यक्ष लुटीतील आरोपी,इंजहार बेग इरफान बेग (२३, रसलपूर) – प्रत्यक्ष लुटीतील
आरोपींपैकी काही जण पूर्वी गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. शाहीद बेगवर केबल चोरीचे गुन्हे तर अमीर खानवर चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. रोख रक्कम – ₹२३,४२,०००/-मोबाईल – ३ नग जप्त करण्यात आले आहे.
उर्वरित ₹२ लाखांच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.सर्व आरोपींना न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात
- PI राहुल गायकवाड (स्था.गु.शा.), PI राहुल वाघ (बाजारपेठ), PI महेश गायकवाड (तालुका) यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.