ताज्या बातम्या

जळगाव शहरात पहाटेपासून पोलिसांचा धडाकेबाज कॉम्बिंग ऑपरेशन; सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई!


 जळगाव दि. १६ : जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटे ४ वाजल्यापासून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती, सराईत गुन्हेगार आणि विविध टोळ्यांविरोधात विशेष धडक कारवाई सुरू केली आहे. या व्यापक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, आरसीपी पथक तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान संशयित आणि सराईत गुन्हेगारांच्या घरांवर झडती घेण्यात येत असून वाहनांचीही कसून तपासणी सुरू आहे. मालकीबाबत खात्री नसलेली अथवा संशयास्पद वाहने पुढील चौकशीसाठी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात येत आहेत.

याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई तसेच संबंधित गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button