Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

शहरातील गणपती नगरातील सार्वजनिक रस्ता की कुणाची खासगी मालमत्ता? रस्त्यावर दगडांचा पहारा; हा प्रकार कोणाच्या वैयक्तिक सोयीसाठी?


गणपती नगरातील रस्त्यावर दगडांचा अडथळा! उच्चभ्रू परिसरातील रस्त्याची अशी अवस्था; वाहनचालकांना कसरत, अपघाताचा धोका वाढला!
जळगाव : शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती नगर परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, रस्त्याच्या मधोमध दगडांची रांग लावल्याने वाहनधारकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आणि सुस्थितीत असलेली घरे असतानाही रस्त्यावरील हे दगड शहराच्या नागरी व्यवस्थेचे वास्तव दाखवून देत आहेत.

हा प्रकार नेमका कोणाच्या वैयक्तिक सोयीसाठी का? सार्वजनिक रस्ता की कुणाची खासगी मालमत्ता आहे का असे प्रश्न उपस्थित होतात? यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास, होत आहे याच प्रशासनाने चौकशी करून खुलासा करावा.
उच्चभ्रू परिसर असलेल्या गणपती नगरातच रस्त्यावर दगडांचे अडथळे का? संबंधित प्रशासन याची दखल घेऊन रस्ता मोकळा करणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होऊ शकतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button