ताज्या बातम्या

गुन्हेगारांचे होणार खर्चीकरण! जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा वॉच; आता प्रत्येक बदमाशाची ‘फुल कुंडली’ पोलिसांच्या फाईलमध्ये!

गुन्हेगारांची मालमत्ता, सोशल मीडिया, मित्रपरिवाराची माहिती पोलिसांकडे जमा ! हिस्ट्रीशीटर्सपासून टवाळखोरांपर्यंत व गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक वाढवण्यासाठी मोहीम सुरू


जळगाव जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी “क्रिमिनल डोजियर M.O.B डेटा बेस” तयार करण्याची व्यापक मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील हिस्ट्रीशीटर्स, हॅबिच्यual ऑफेंडर्स, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे आरोपी, टवाळखोर तसेच प्रतिबंधात्मक कारवाईतील संशयितांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचे MOB (Modus Operandi Bureau) फॉर्म भरून घेतले जात आहेत.

या फॉर्ममध्ये संबंधित गुन्हेगाराची कुटुंब माहिती, आधार-पॅन तपशील, मालमत्ता, वाहने, सोशल मीडिया अकाउंट्स, शारीरिक खुणा, टॅटू, मित्रपरिवार, पूर्वीचे गुन्हे, गुन्हा करण्याची पद्धत, कार्यक्षेत्र, व्यसनाधीनता व कर्जाची माहिती संकलित केली जात आहे.

या मोहिमेमुळे प्रत्येक पोलिस स्टेशनकडे गुन्हेगारांचा अद्ययावत डेटाबेस तयार होणार असून, विविध पोलिस ठाण्यांमध्ये माहितीची जलद देवाण-घेवाण शक्य होणार आहे. तसेच फरार आरोपींवर कठोर कारवाई, मालमत्ता जप्ती आणि नवीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हेगारांची ओळख सुलभ होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button