जळगावCrimeताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

जळगावात पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समितीची स्थापना; पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे निर्णय

शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीवर भर देत; महिला दक्षता समितीची सुरुवात


प्रतिनिधी जळगाव : सन २०२२ च्या शासन निर्णयानुसार पोलिस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सदर समितीची स्थापना करण्यात आली असून आज तिची पहिली बैठक पार पडली. या समितीत विविध क्षेत्रातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.बैठकीत महिला व बाल सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर केवळ मुख्याध्यापकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत लहान मुलांशी संबंधित गुन्हे प्रतिबंध, जनजागृती आणि आवश्यक कारवाई याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तसेच जळगाव शहरात लवकरच २५ ठिकाणी पॉक्सो आणि सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी एकसंध आणि परिपूर्ण सादरीकरण (PPT) तयार करून ते सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दाखवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

नवीन ‘दामिनी पथक’ शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष ठेवून नियमित पेट्रोलिंग करणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.याशिवाय, दिनांक १८ रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची कार्यशाळा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.महिला व बाल सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी या निर्णयांना महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

समितीची रचना पुढीलप्रमाणे आहे :जळगाव महिला दक्षता समिती जाहीर; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश

जळगाव : महिला व बाल सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या महिला दक्षता समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची रचना पुढीलप्रमाणे आहे :

श्री. श्रीकांत धिवरे – पोलीस अधीक्षक, जळगाव – अध्यक्ष

श्री. प्रदीप ठाकूर – सदस्य

पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) – सचिव

कल्याणी पाटील – पो. उपनिरीक्षक, भरोसा सेल – सचिव

डॉ. रेणुका चव्हाण – डॉक्टर – सदस्य

ॲड. अणुराधा एल. वाणी – सरकारी वकील – सदस्य

ॲड. भारती ज्ञानेश्वर कुमावत – वकील – सदस्य

कांचन नारखेडे – मुख्याध्यापिका, गुळवे शाळा – सदस्य

प्रतिभा सूर्यवंशी – मानवसेवा माध्यमिक विद्यालय, जळगाव – सदस्य

राजश्री महाजन – शकुंतला शाळा, जळगाव – सदस्य

विद्या सोनार – आधार बहुउद्देशीय संस्था – सदस्य

भाग्यश्री सोनवणे – आधार बहुउद्देशीय संस्था – सदस्य

या समितीद्वारे जिल्ह्यात महिला व बाल सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून प्रशासन, शिक्षण, वैद्यकीय व कायदा क्षेत्रातील समन्वयातून प्रभावी कामकाज अपेक्षित आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button