Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

जळगाव जिल्हा बांधणीसाठी समता सैनिक दलाची खंबीर वाटचाल; शहर कार्यकारणी जाहीर, गावागावात शाखा विस्ताराचे आवाहन


जळगाव (प्रतिनिधी) – समता सैनिक दल या संघटनेच्या जळगाव जिल्हा बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जळगाव महानगर व तालुकास्तरीय बैठक दिनांक २० फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही बैठक राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राज्य संघटक विजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीत संघटनेची ऐतिहासिक वाटचाल, संघर्ष, शिस्त आणि तत्वनिष्ठ कार्यपद्धती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनेची भूमिका आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव करून देण्यात आली.

राज्याध्यक्ष बागुल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले समता सैनिक दल हे सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार घराघरात आणि गावागावात पोहोचविण्याची जबाबदारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांवर आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात संघटनेच्या शाखा स्थापन करून सर्व समाजघटकांना संघटनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशातील सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, समता सैनिक दलाने सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना एकत्र आणून सामाजिक एकता आणि समतेचा संदेश देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची आणि विचारांची सर्वजण प्रशंसा करतात, मात्र त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेत सहभागी होण्याबाबत उदासीनता का आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

या बैठकीत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जळगाव जिल्हा पश्चिम मुख्य संघटकपदी चेतन नन्नवरे यांची निवड करण्यात आली. तसेच जळगाव शहर कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.जळगाव शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली

:अध्यक्ष – मुकुंद भालेराव ,सचिव – संजय सपकाळे, संघटक – सुधाकर बाविस्कर, कल्पना ब्राह्मणे, अनिता कापुरे, सिद्धार्थ सोनवणे ,प्रचारक – गौतम सोनवणे, प्रतिभा घोडेस्वार, सुधीर सैंदाणे

या बैठकीस जिल्हा अध्यक्ष पश्चिम किशोर डोंगरे, पूर्व जिल्हाध्यक्ष संजय तायडे, पूर्व जिल्हा मुख्य संघटक सुपडू संदानशिव, जिल्हा सचिव अनिल सोनवणे, मिलिंद जंजाळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शिंदे, संघटक गोकुळ अहिरे, अरुण खैरे, जिल्हा प्रचारक किरण शर्मा, चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव आणि पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी जळगाव जिल्हा पूर्व मुख्य संघटक सुपडू संदानशिव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाच्या संघटनात्मक विस्ताराला नवे बळ मिळाले असून, येत्या काळात गावागावात शाखा स्थापन करून सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी संघटना अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button