ताज्या बातम्या

जळगाव शहरातील आयटीआय ते ब्रेन हॉस्पिटलदरम्यान समांतर रस्त्यासाठी अतिक्रमणाची मोठी कारवाई; ३५ चायनीज गाड्या व क्रिकेट बॅट बनवणाऱ्यांची घरे जमीनदोस्त, पाच गाड्या जप्त.


जळगाव प्रतिनिधी: शहरातील राष्ट्रीय महामार्गावर आयटीआय ते ब्रेन हॉस्पिटल दरम्यान प्रस्तावित समांतर रस्त्याच्या कामासाठी आज मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांनी मनपाकडे मदत मागितल्यानंतर सोमवारी रोजी सदर भागात संयुक्त कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान मुलांची आयटीआय ते ब्रेन हॉस्पिटल या मार्गावर असलेली एकूण ३५ चायनीज गाड्या (खाद्यपदार्थाच्या गाड्या) व दहा क्रिकेट बॅट बनवणाऱ्या व्यावसायिकांची घरे आणि शेड्स हटवण्यात आली. अनेक वर्षांपासून या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले होते.

मनपाच्या पथकाने सकाळपासूनच कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान काही ठिकाणी विरोधाचा प्रयत्न झाला, मात्र कारवाई सुरळीत पार पडली. अतिक्रमण हटवताना पाच चायनीज गाड्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून सांगण्यात आले की, समांतर रस्त्याचे काम शहराच्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे आयटीआय ते ब्रेन हॉस्पिटल दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने ही कारवाई आवश्यक होती.

मनपा प्रशासनाने स्पष्ट केले की, भविष्यातही रस्ते, नाले व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून, कोणालाही सूट दिली जाणार नाही. नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण हटवावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button