ताज्या बातम्या

विद्यार्थी दिन उत्साहात साजरा; महामानवांच्या पुतळ्यास सन्मानपूर्वक अभिवादन


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हा कार्यक्रम पार पडला.

7 नोव्हेंबर 1990 रोजी डॉ. आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पहिला टप्पा सुरू केला होता. त्यांच्या या ऐतिहासिक शालेय प्रवेशदिनाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी 7 नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिन” म्हणून घोषित केला.

कार्यक्रमाची सुरुवात भंते सुबोधा थेरो यांच्या हस्ते पंचशील प्रार्थनेने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी चेतन नन्नवरे, जयसिंग वाघ, हरिश्चंद्र सोनवणे सर, ॲड. आनंद कोचुरे, प्रा. प्रितीलाल पवार सर, बाबुराव वाघ, सतीश गायकवाड, आशिष सपकाळे, सुभाष सपकाळे, बागुल साहेब, तायडे साहेब, यशवंत मोरे, अभय सोनवणे, मुकुंद सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात जयसिंग वाघ, प्रा. प्रितीलाल पवार आणि आशिष सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सरांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबुराव वाघ यांनी मानले.

 

डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी म्हणून ओळखले. त्यांच्या विद्वत्तेचा आणि ज्ञानलालसेचा गौरव म्हणून साजरा होणारा हा विद्यार्थी दिन समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button