जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच *अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी!
जळगाव, दि.२२ — जळगाव क्रिकेट लिग (JCL T-20) मध्ये उपांत्यफेरी गाठण्यासाठी संघांमध्ये चुरस वाढली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यांत अमळनेर सुहांस जायंट्सने चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सवर ६३ धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर रावेर रॉयल्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ७ धावांनी रोमांचक विजय नोंदवला.
अमळनेरकडून अजय पाटील (३४) व सतीश चतुर्वेदी (२०) यांच्या खेळीमुळे १४७ धावांचा डोंगर उभा राहिला. प्रत्युत्तरात चाळीसगाव संघ ८४ धावांत गारद झाला. मोहम्मद सैफ सामनावीर ठरला.
दुसऱ्या सामन्यात रावेरने १३० धावा करताना यश नहारने ३१ धावांसह ३ बळी घेत सामनावीराचा मान पटकावला. पाचोरा संघ १२३ धावांवर थांबला.
दरम्यान, गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज व जळगाव कोगटा किंग हे प्रत्येकी ६ गुणांसह अव्वल स्थानी आहेत. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यांनंतर क्वालीफायर निश्चित होणार आहे.