मनपाची अखेर कारवाई सुरू; भंगाळे गोल्डचे एलईडी जाहिरात फलक हटविले.
प्रतिनिधी जळगाव : शहरातील चौक व दुभाजकांच्या सुशोभीकरणाच्या कामात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जळगाव महानगरपालिकेने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. दुपारी सुमारे २ वाजल्यापासून अतिक्रमण विभागाने भंगाळे गोल्ड यांचे सुशोभीकरणावरील एलईडी जाहिरात फलक हटविण्याची कारवाई सुरू केली. अदानी ग्रुप, आर एल ज्वेलर्स सहित अनेक व्यवसायिकांचे led बोर्ड जप्त करण्यात आले.
महानगरपालिकेने यापूर्वीच हॉटेल रॉयल पॅलेस, आर. एल. ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड, आदित्य फार्म, सुप्रीम इंडस्ट्रीज, अदानी सिमेंट, डायनामिक्स मल्टी प्रो, जैन इरिगेशन, सरस्वती फोर्ड, आर. सी. बाफना आणि जी. एम. फाउंडेशन यांच्यासह ११ संस्था व कंपन्यांना नोटिसा बजावून एनओसी मिळण्यापूर्वी जाहिरात न करण्याचा इशारा दिला होता. संबंधितांना स्वतःहून फलक काढण्याची संधीही देण्यात आली होती.
मात्र नोटिशीकडे दुर्लक्ष झाल्याने महानगरपालिकेने आता प्रत्यक्ष कारवाई सुरू केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर संस्थांविरुद्धही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.