जळगाव जिल्हा पोलीस यांच्या वतीने 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त, ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धा; १२ ऑगस्टपर्यंत प्रवेश, १५ ऑगस्टला प्रदर्शन.
जळगाव : १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता भागीदारी छायाचित्र स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. पोलीस, पत्रकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा होत असून पोलिस इन पब्लिक सर्विस, क्राइम, सोशल, ट्रॅफिक, जळगाव हेरिटेज, स्पोर्ट्स आणि वुमन इम्पॉवरमेंट अशा सात गटांत छायाचित्रे स्वीकारली जाणार आहेत. स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट २०२६ असून ती ९७०२२००३१५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावीत. निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे भरविण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या छायाचित्रांतून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि सेवाभावाचे प्रभावी दर्शन घडविण्याचे आवाहन केले आहे.