Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगाव शहर पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड, दोन सराईत आरोपी अटकेत


प्रतिनिधी: जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सुमारे ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.

दि. २५ जूनच्या रात्री ते २६ जूनच्या सकाळी दरम्यान शिवाजीनगर, भगतसिंग चौक येथील सुशील भाईलाल भावसार (वय ६१) यांच्या घरातून डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, पितळी कळशी आणि ३ हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राफत शेख फिरोज (वय २०, गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०, सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनिल पाटील, दीपक शिरसाट, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार आणि भगवान मोरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button