Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक
आचारसंहितेला हरताळ? जळगाव शहरात वाढदिवसाच्या बॅनरवर पक्ष चिन्हांसह नेत्यांचे फोटो झळकले!
जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असताना जळगाव शहरातील विविध भागांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या बॅनरवर राजकीय पक्षांचे चिन्ह तसेच प्रमुख नेत्यांचे फोटो झळकत असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय प्रचार किंवा पक्षीय प्रसिद्धीवर निर्बंध असतात. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या नावाखाली पक्षीय ओळख ठळकपणे दर्शविणारे बॅनर शहरात दिसून येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची निवडणूक प्रशासनाने दखल घेणार का? संबंधित बॅनर हटविण्यात येणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.