Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

15 मे 2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन), जळगाव येथे उत्साहात झाले संपन्न..


जळगाव प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका व तहसील कार्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन), जळगाव येथे उत्साहात संपन्न झाले.

नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिराचे उद्घाटन मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, मा. महापौर श्रीमती दीपमाला काळे, मा. उपमहापौर मनोज चौधरी तसेच मा. स्थायी समिती सभापती श्री. चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) श्रीमती निर्मला गायकवाड, उपायुक्त (महसूल) श्रीमती धनश्री शिंदे, उपायुक्त (सार्वजनिक कामे) श्री. पंकज गोसावी, उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, प्रकाश बालाणी, अरविंद देशमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या 

या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना प्रत्यक्ष देण्यात आला. मनपा DAY-NULM अंतर्गत 8 बचत गटांना कर्ज मंजुरी देण्यात आली. मनपा जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत 42 लाभार्थ्यांना जन्म व मृत्यू दाखले वितरित करण्यात आले. 

विवाह नोंदणी विभागामार्फत 11 लाभार्थ्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.

दवाखाने विभागामार्फत 43 नागरिकांना आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 20 लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली, तर नगररचना विभागामार्फत 12 नागरिकांना बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 21 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. महिला व बाल विकास विभागामार्फत 22 लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला. जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत 50 लाभार्थ्यांना योजनांची माहिती देण्यात आली.नगर भूमापन कार्यालयामार्फत 10 नागरिकांनी विविध विषयांवर माहिती घेतली.

 जळगाव तलाठी कार्यालय व मेहरून तलाठी कार्यालयामार्फत उत्पन्न दाखले – 5, जात प्रमाणपत्र – 5, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र – 5 तसेच डोमिसाईल व नॅशनलिटी प्रमाणपत्र – 3 नागरिकांना वितरित करण्यात आले.आधार केंद्रामार्फत 5 नागरिकांना नवीन आधार कार्ड वाटप करण्यात आले तसेच 5 नागरिकांच्या आधार कार्ड अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.शिक्षण विभागामार्फत 25 लाभार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनांची माहिती देण्यात आली.

शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर व जनजागृती करणारे प्रदर्शनीय स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांनी विविध योजनांविषयी माहिती घेऊन शासकीय सेवांचा लाभ घेतला. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मोनाली लांगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. गायत्री पाटील यांनी मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button