ताज्या बातम्या

जळगावात ४४ अंश तापमानात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मनसेकडून सन्मान…,


जळगाव प्रतिनिधी:  1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मनापासून सत्कार करण्यात आला. प्रचंड उन्हात, तब्बल ४४ अंश तापमानात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना गुलाबाचे फूल व गार पाण्याची बाटली देऊन सन्मानित करण्यात आले.

मनसेच्या वतीने यावेळी स्पष्ट भावना व्यक्त करण्यात आली की, समाजाच्या आरोग्याची जबाबदारी पेलणाऱ्या कामगारांना केवळ कामगार दिनापुरते नव्हे, तर वर्षभर सन्मान मिळाला पाहिजे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांचा मान-सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

या उपक्रमाचे नियोजन मनसेचे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, पंकज चौधरी, विकास पात्रे, जयेश मराठे,शुभम भावसार उपस्थित होते

 यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याला सलाम केला. समाजातील प्रत्येक घटकाने या कर्मचाऱ्यांचा आदर करावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button