प्रभाग १२ मध्ये भाजपचा प्रचार शिगेला; गायत्री राणेंना नागरिकांचा कुटुंबीयांसारखा पाठिंबा
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. भाजपच्या वतीने गायत्री इंद्रजीत राणे (१२-क), नितीन मनोहर बरडे (१२-ड) आणि अनिल सुरेश अडकमोल (१२-अ) हे उमेदवार रिंगणात असून, नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार सुरू आहे.
या प्रचार भेटीदरम्यान भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जळगाव मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष (रामानंदनगर व महाबळ परिसर) अजित राणे, विलास राणे, बंडूभाऊ बरडे यांच्यासह राजू शिंदे, अक्षय चौधरी, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, रोहित देवरे, तन्मय राणे, अजय चौधरी, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलु शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, आशिष सपकाळे, खुशाल महाजन, संकेत कापसे, निरज बरडे, अजिंक्य पाटील, संतोष भंगाळे, ललित पाटील, सुदर्शन चौधरी, संतोष पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टेलिफोन नगर, समिंत्र कॉलनी, पार्वती नगर, पटेल नगर या परिसरात झालेल्या भेटीत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांबाबत आपले अनुभव मोकळेपणाने मांडले. उमेदवारांनी नागरिकांच्या प्रश्नांना गांभीर्याने ऐकून घेऊन, निवडून आल्यास प्राधान्याने सोडविण्याचा विश्वास दिला.यावेळी नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,“ताई कुटुंबासारख्या आमच्यातीलच आहेत. सुख-दुःखात त्या कायम आमच्या सोबत उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आम्हाला त्यांनाच नगरसेवक म्हणून पाहायचे आहे.”
या प्रचाराला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
unlocker.ai – The Ultimate AI Tool for Bypassing Restrictions and Unlocking Content Seamlessly!