ताज्या बातम्या

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा सुधारित आदेश जारी; शासकीय कार्यालयांसाठी महत्त्वाची सूचनासुट्टीच्या आदेशात बदल! धनत्रयोदशीची सुट्टी रद्द, दिवाळीसाठी ९ नोव्हेंबर निश्चित!

दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांच्या


विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा सुधारित आदेश जारी; शासकीय कार्यालयांसाठी महत्त्वाची सूचना

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्थानिक सुट्टीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा बदल केला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी, शुक्रवार ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी देण्याचा सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत हा आदेश काढण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या स्वाक्षरीने २ नोव्हेंबर २०२६ रोजी हा सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशानुसार, यापूर्वी जाहीर करण्यात आलेली धनत्रयोदशीची स्थानिक सुट्टी रद्द करून दिवाळीनिमित्त ९ नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसेच संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.सर्व जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी सुधारित आदेशाची नोंदघेणे आवश्यक आहे.

या निर्णयाची माहिती संबंधित विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि प्रशासकीय कार्यालयांना देण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

नागरिकांनी घ्यावी नोंद

स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल झाल्याने शासकीय कार्यालयात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी ६ आणि ९ नोव्हेंबरच्या सुट्टीबाबत या सुधारित आदेशाची नोंद घ्यावी. कार्यालयीन कामाचे नियोजन करताना संबंधित विभागाकडून खात्री करून घेणे हिताचे ठरेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button