Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

प्रचिती फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; जंगल-शेतशिवारातील रखवालदारांना १०० रेनकोटचे मोफत वाटप

गाडेगाव परिसरातील शेतकरी, शेतमजूर व शेतरक्षकांना पावसाळ्यात दिलासा; समाजसेवेची परंपरा कायम


जळगाव, दि.२ ऑगस्ट : समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत प्रचिती फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने गाडेगाव जंगल व शेतशिवार परिसरातील शेतीची राखण करणाऱ्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर आणि रखवालदार बांधवांना १०० रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले. पावसाळ्यात सतत पावसात भिजत काम करणाऱ्या शेतरक्षकांना दिलासा देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

पावसाळ्यात शेतांची राखण करताना अनेकांकडे आवश्यक संरक्षणाची साधने नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रचिती फाउंडेशनने गरजूंपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून रेनकोटचे वितरण केले. या मदतीमुळे पावसाळ्यातील दैनंदिन कामे अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी प्रचिती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन घुगे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले. यावेळी अशोक घुगे, पूजा घुगे, संजय घुगे, गौरव पाटील, रोशन वाघ, सुनंदा घुगे तसेच प्रचिती मीडियाचे अक्षय लोडते, राम बोरसे, तेजस वर्दे, नितीन वाघ, जयेश पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत अशा लोकाभिमुख उपक्रमांना सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रचिती फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे समाजाशी नाते दृढ करत आहे. भविष्यातही गरजूंसाठी अशाच उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

या उपक्रमाबद्दल गाडेगाव परिसरातील शेतकरी व शेतरक्षकांनी प्रचिती फाउंडेशनचे आभार मानत, पावसाळ्यात प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या या मदतीमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button