स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त जळगावात जनसेवा सप्ताहाचे आयोजन
प्रतिनिधी : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २२ ते २८ जुलै २०२६ दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला असून, बुधवारी (२२ जुलै) सकाळी १०.१० वाजता शिव कॉलनी स्टॉप येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज, सकाळी ११.४५ वाजता रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दुपारी १२.१५ वाजता नेहरू चौकातील पंडित जवाहरलाल नेहरू, दुपारी १.०० वाजता टॉवर चौकातील लाल बहादूर शास्त्री, दुपारी १.४५ वाजता फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले, दुपारी २.३० वाजता नेरी नाका येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दुपारी ३.०० वाजता महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधी तसेच दुपारी ३.४५ वाजता स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून माल्यार्पण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.